17/06/2024
Spread the love

मुंबई: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींचं लग्नाच्या काही वर्षांनंतर घटस्फोट झालं आहे. घटस्फोटानंतर काही अभिनेत्रींनी दुसरं लग्न करण्याचा विचार केला, तर काहींनी मात्र सिंगल राहण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री करिश्मा कपूर हिने देखील घटस्फोटानंतर एकटं राहण्याचा निर्णय घेतला. पण आता वयाच्या ४९ व्या वर्षी करिश्मा कपूर हिच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्री मुंबईतील एका श्रीमंत उद्योजकासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध पत्रकाराने करिश्माच्या दुसऱ्या लग्नाचा दावा केला आहें. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र करिश्माच्या हिच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा रंगत आहे.
‘करिश्मा कपूर सध्या मुंबईतील एका श्रीमंत उद्योजकाच्या प्रेमात आहे आणि दोघे लवकरच लग्न करणार आहेत…’ असा दावा पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध पत्रकाराकडून करण्यात आला आहे. पण अद्याप यावर करिश्मा किंवा कपूर कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, याआधी देखील पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध पत्रकाराने बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल अनेक फेक दावे केले आहेत. तर दुसरीकडे, करीश्मा काहीदिवसांपूर्वी फ्रान्स याठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *