17/06/2024
Spread the love

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये युट्यूबर्सचं पारडं जड असल्याचं पहायला मिळतंय. अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव या दोघांमध्ये चांगली टक्कर पहायला मिळतेय. सोशल मीडियावरही या दोघांना चाहत्यांकडून जोरदार पाठिंबा मिळतोय. या दोघांपैकीच कोणीतरी विजेता ठरणार, असा अंदाज नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या दोघांची चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे, याची झलक नुकतीच दिल्लीत पहायला मिळाली. एल्विशच्या चाहत्यांनी दिल्लीच्या रस्त्यावर येऊन ट्रॅफिक जाम केला. दिल्लीत एल्विशसाठी कार रॅली काढण्याच्या निर्णय त्याच्या चाहत्यांनी घेतला. त्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमली आणि ट्रॅफिक जाम झाला.
जवळपास एक लाखापेक्षा जास्त लोक एल्विशला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले. कार, बाईक या वाहनांसह चाहते या रॅलीत सहभागी झाले होते. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही गर्दी थोड्या वेळात इतकी वाढली की अखेर त्याला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर यावं लागलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *