17/06/2024
Spread the love

पुणे: देशातील शेतकऱ्यांसमोर नेहमी संकटे कधीच संपत नाही. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळाच्या फेऱ्यात शेतकरी येतो. त्यातून बाहेर पडल्यावर शेतमालास दर मिळत नाही. कांदा आणि टोमॅटोची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार या प्रश्नांना समोरे जावे लागते. अनेक वेळा दर मिळत नसल्यामुळे टॉमेटो अन् कांदे भाव नसल्यामुळे रस्त्यावर फेकून द्यावे लागते. यंदा टोमॅटो पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले. टोमॅटोचे हब म्हणून ओळखले जाणाऱ्या नारायणगावात यंदा कोट्यवधींचे उलाढल झाली.
नारायणगाव बाजारात टोमॅटोचे भाव कोसळले आहे. बाजार समितीत टोमॅटोची आवक वाढल्याने बाजार कोसळले आहे. यंदा जुलै महिन्यात टोमॅटोच्या क्रेटला सर्वाधिक 3500 रुपये बाजारभाव मिळाला होता. परंतु आता गुरुवारी नारायणगाव बाजार समितीत नऊ हजार क्रेटची आवक वाढली. यामुळे 20 किलोच्या क्रेटला अकराशे रुपये बाजार भाव मिळाला आहे.
एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत १७ लाख ९९ हजार क्रेटची खरेदी, विक्री झाली आहे. यामाध्यमातून बाजार समितीमध्ये १०७ कोटींची उलाढाल झाली आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची उलाढाल टोमॅटो लागवडीतून केली.
नारायणगाव शेतकऱ्यांचा फायदा झाला, त्या प्रमाणे तरुणांना रोजगार मिळाला. दिल्ली, कर्नाटक, गुजरात ओडिशामधून अनेक व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी आले. राज्यातील विदर्भ, मराठवाड्यातूनही अनेक व्यापारी नारायणगावात आले. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला.
यंदा देशात टोमॅटोचे उत्पादन कमी झाले. यामुळे देशात टोमॅटोला चांगला बाजार भाव मिळला. गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात टोमॅटोचे उत्पादन झाले. त्यामुळे यंदा टोमॅटोला आतापर्यंतचा सर्वाधिक 3500 रूपये क्रेटला भाव मिळाला होता. परंतु आता टोमॅटोची आवाक वाढल्यामुळे दर कमी होऊ लागले आहे. आता हा दर 700 ते 1000 रुपये भाव मिळत आहे. यामुळे ग्राहकांना आता लवकरच स्वस्त टोमॅटो मिळणार आहे. परंतु शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *