17/06/2024
Spread the love

नवी दिल्ली : टाटा समूहाने एअर इंडिया खरेदी केली. एअर इंडिया तोट्यात होती, अजूनही त्यात मोठा फरक आलेला नाही. पण बदल सुरु आहेत. एअर इंडियाला नवीन उभारी देण्याचा प्रयत्न सुरु आहे. टाटा समूहाने एअर इंडियाचे रुपडे पालटले आहे. 470 नॅरो आणि वाईडबॉडी जेटच्या ऑर्डरचा रेकॉर्ड केल्यानंतर टाटा समूहाने एअर इंडियाचे रिब्रँडिग केले आहे. एअर इंडियाच्या नवीन लोगोने अनेकांन मोहिनी घातली आहे. हा लोगो पाहिल्यानंतर अनेकांच्या तोंडातून ‘वाह’, ‘एकदम जोरदार’, ‘झक्कास’ असेच शब्द बाहेर पडतील. रुपडे पालटलेला हा महाराज सेवेत पण कमी नाही. महाराजाचा हा बदल अनेकांना आकृष्ट करेल. या रंगसंगतीने नव्या दमाच खेळाडून पुन्हा मैदानात उतरल्याचा भास नक्की होतो.
नवीन लोगोच्या रंगात एअरलाईन्सचा शुभंकर महाराजा न्हाऊन निघाला आहे. आधुनिक रुप, स्टाईलिश डिझाईन, लाल, पांढरा आणि नारंगी रंगाच्या सरमिसळीने हा नवा लोगो डोळ्याचे पारणे फेडतो. हा लोगो अपिल झाला आहे. तो मनाला भुरळ घालतो. ‘अमर्यादीत शक्यतांचे हे प्रतिक’ असल्याचा विश्वास टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी व्यक्त केला. नवीन लोगो जुन्या लोगाची जागा घेईल. ‘अमर्यादीत शक्यतांचे हे प्रतिक’ असल्याचे टाटा सन्सच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले. हा नवीन लोगो एअरलाईन्सची धाडस आणि आत्मविश्वास दर्शवितो. टाटा समूहाच्या धारिष्ट्याचेच जणू ते प्रतिक आहे. गेल्या 12 महिन्यात एक जोरदार टीम तयार झाल्याचे एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले. एअरलाईन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना अपडेट आणि अपग्रेड करण्याचे काम सुरु आहे. विमान सेवा अधिक सुधारीत आणि ग्राहकाभिमूख करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
टाटा सन्सने एअर इंडियाची खरेदी केली. सहायक कंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून जानेवारी 2022 मध्ये एअर इंडियाचे अधिग्रहण करण्यात आले. एअर इंडिया आणि टाटा सन्सची आणखी एक सहायक कंपनी विस्ताराचे विलिनीकरण करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. हे विलिनीकरण मार्च 2024 पर्यंत करण्यात येईल, असा अंदाज होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *