17/06/2024
Spread the love

राहुल गांधी यांच्या कृतीमागे वात्सल्याची भावना होती. फक्त महिला खासदारांना पाहून त्यांनी असं केलं नव्हतं, असं ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
या विषयावरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या वादामध्ये आता एका महिला आमदाराने केलेल्या वक्तव्यावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “आमच्या राहुल गांधींना मुलींची कमतरता नाही. जर त्यांना फ्लाईंग किस द्यायचीच असेल, तर ते तरुण मुलीला देतील. ते वृद्ध महिलेला फ्लाईंग किस का देतील? हे सर्व आरोप निराधार आहेत” असं नीतू सिंह म्हणाल्या. त्या बिहारच्या काँग्रेस आमदार आहेत.
भाजपा नेत्यांनी नीतू सिंह यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. “महिला विरोधी काँग्रेस सभागृहातील राहुल गांधींच्या दुराचाराचा बचाव करु शकते” असं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहझाद पूनावाला यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला. बृज भूषणच्या विषयावर तुम्ही गप्प का ? असा सवाल केला. “भाजपा खासदारावर आपल्या चॅम्पियन कुस्तीपटूंना त्रास दिल्याचा, त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. महिला आणि बाल विकास मंत्र्यांकडून त्या विरोधात एक शब्दही ऐकला नाही. आणि आता तुम्ही फ्लाईंग किस बद्दल बोलताय. तुमचं प्राधान्य कशाला आहे मॅडम” असा सवाल महुआ मोईत्रा यांनी विचारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *