17/06/2024
Spread the love

https://amzn.to/3FppFMP

नवी दिल्ली : चीनची अर्थव्यवस्था सुस्तावली आहे. जर्मनी आणि युरोपातील अनेक अर्थव्यवस्थांनी मंदीचा धसका घेतला आहे. इंग्लंडची अर्थव्यवस्था संघर्ष करत आहे. तर अमेरिकन अर्थव्यवस्थेचे युद्ध सुरुच आहे. अशा परिस्थिती भारतीय अर्थव्यवस्थेने रॉकेट भरारी घेतली आहे. जगभरातील रेटिंग संस्थांनी भारताला मानांकन दिले आहे. भारत ब्राईट स्पॉट असल्याचा निर्वाळा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अविश्वास प्रस्ताव बोलताना, आपल्या हातात पुन्हा सत्ता दिल्यास भारत 2028 पर्यंत तिसरी मोठी अर्थव्यवस्था करण्याचा दावा केला आहे. त्याचवेळी भारतातील राज्यातही प्रमुख अर्थसत्ता होण्यासाठी स्पर्धा तीव्र झाली आहे. हा बहुमान आतापर्यंत अर्थातच महाराष्ट्राकडे आहे. पण इतर ही राज्य या स्पर्धेत उतरली आहेत.
देशात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वात मजबूत आणि मोठी आहे. जीडीपाचा आकार 430 अब्ज डॉलर इतका आहे. राज्याचा विकास वृद्धी दर 8.50 टक्के इतका आहे. महाराष्ट्र सरकारने 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर म्हणजे एक लाख कोटी डॉलरच्या घरात नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे लक्ष गाठण्यासाठी राज्याला 11 टक्के वृद्धी दर गाठावा लागेल. हा दरच कायम ठेवावा लागेल.
महाराष्ट्राला इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्य, दळणवळण, शेती, कृषीपुरक व्यवसाय, औद्योगिक विकासात अजून मोठे काम करण्याची संधी आहे. महाराष्ट्र, एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष सहज गाठू शकेल. सध्या राज्याची औद्योगिक घौडदौड भारतातच नाही तर युरोपातील काही देशांपेक्षा पण अधिक आहे. मुंबई शहराचा जीडीपी देशात सर्वाधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *