17/06/2024
Spread the love

बोल्ड, हॉट दिसणारी सारा अली खान एकेकाळी वाढत्या वजनामुळे त्रस्त होती. साराने खुद्द तिच्या आरोग्याबद्दल मोठी माहिती दिली होती. सोशल मीडियावर अभिनेत्रीने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये साराने स्वतःचा फॅट-टू-फिट असा प्रवास दाखवला होता.. एवढंच नाही तर, एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या प्रकृतीबद्दल देखील मोठा खुलासा केला होता. पीसीओडीमुळे साराचं सतत वजन वाढत होतं.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अभिनेत्रीचं वजन ९६ किलो होतं. वजन कमी करण्यासाठी अभिनेत्रीने मोठी मेहनत घेतली. एकदा साराने तिच्या फिटनेस प्रवासाबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला होता. तिचं वजन ९० किलोपेक्षा जास्त वाढलं होतं. याचं कारण तिचं आजारपण होतं, परंतु जेव्हा तिने फिट होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अभिनेत्रीने कसलाही विचार केला नाही. आज सारा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
सारा हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेत्री ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाच्या माध्यमातून चाहच्यांच्या भेटीस आली. सिनेमात साराने अभिनेता विकी कौशल याच्यासोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं..
सारा हिने ‘केदरनाथ’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. सिनेमात तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत होता. चाहते कायम साराच्या नव्या सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *