17/06/2024
Spread the love

न्युझीलंडला सेमी फायनल मध्ये नमवून टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये धडक मारली आहे. विराट कोहली , श्रेयस अय्यरच्या विक्रमी खेळीमुळे भारताने धावांचा डोंगर रचला आणि मॅचमध्ये 7 विकेट्स मोहम्मद शमीने न्युझीलंडचा संघ गारद केला. टीमच्या या अभूतपूर्व यशामुळे भारतीय चाहते भलतेच खुश असून आता फायनलमध्येही विजयाचा झेंडा असाच फडकत राहू दे अशीच सर्वा चाहत्यांची प्रार्थना आहे.
या यशात बॅट्समनचा जेवढा मोलाचा सहभाग आहे, तितकाच सिंहाचा वाटा मोहम्मद शमीचाही आहे. या मॅचमध्ये शमीने 7 विकेट काढून भारताला शानदार विजय मिळवून दिला. वनडे क्रिकेटमध्ये त्याने चौथ्यांदा पाच विकेट्स घेतल्या. त्याशिवाय आणखी एक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. वर्ल्ड कपमध्ये 50 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे. सेमीफायनलमधील त्याच्या शानदार कामगिरीमुळे काल त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कारही देण्यात आला. या सरस कामगिरीमुळे अख्खं जग त्याला नावाजतयं, सोशल मीडियावर त्याच्या कौतुकाच्या पोस्ट्स पडत आहेत.
मात्र असं असलं तरी एक व्यक्ती अशी आहे, जिने वर्ल्डकपमधील शमीच्या या अभूतपूर्व कामगिरीची दखलही घेतलेली नाही. ती व्यक्ती म्हणजे शमीची पत्नी हसीन जहाँ. गेल्या काही काळापासून त्यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादाची बरीच चर्चा झाली. 2018 सालापासून ते दोघे वेगळे रहात आहेत. हसीन जहाँ हिने त्याच्यावर अनेक आरोपही केले. त्यामुळे शमीवर काही काळ टीकाही झाली. अनेक कौटुंबिक समस्या सुरू होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *