17/06/2024
Spread the love

पांढरा तांदूळ हा जगातील सर्वात प्रमुख आहार आहे, तो अनेक प्रकारे शिजवला आणि खाल्ला जातो. हे पदार्थ आपल्याला ऊर्जा प्रदान करतात. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना तर भात खाल्ल्याशिवाय झोप लागणार नाही अशी परिस्थिती आहे. हा भात जास्त प्रमाणात खाल्ल्यास खूप नुकसान होऊ शकतं.
शरीराला जर योग्य प्रमाणात फायबर मिळालं नाही तर बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. डाळ, भाज्या, गहू, ज्वारी, बाजरी हे धान्य जेवणात असावं. हे सगळं पाचन तंत्र निरोगी ठेवण्यास मदत करतात. पांढऱ्या तांदळात फायबरचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे पांढरा भात कमी प्रमाणात खावा.
पांढऱ्या तांदळात भरपूर कॅलरीज असतात. कॅलरीज जास्त असेल तर कंबरेची चरबी वाढणे. वजन वाढणे, रक्तातील साखर वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार पांढरा भात खावा.
पांढऱ्या तांदळामध्ये इतर धान्यांच्या तुलनेत पौष्टिक घटक कमी असतात. या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हाडे, दात आणि इतर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे इतर अनेक समस्या निर्माण होतात. सारखाच भात खाल्ल्याने प्रतिकारशक्ती सुद्धा कमी होते.
पांढऱ्या तांदळामुळे रक्तातील साखर वाढते. बरेचदा मधुमेह असणाऱ्यांना पांढरा तांदूळ खाऊ नका असं सांगितलं जातं. तांदळामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. पांढरा भात खाल्ल्याने डायबिटीजचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ज्या लोकांना मधुमेह आहे त्या लोकांनी शक्यतो भात खाणे टाळावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *