16/06/2024
Spread the love

मुंबई : मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी किती वेळ लागेल हे आत्ताच सांगता येणार नाही असं मागासवर्ग आयोगानं स्पष्ट केलंय.. कोणी उपोषणाला बसलं किंवा उपोषण स्थळावरुन अंतिम मुदत दिली म्हणून न्यायव्यवस्था आणि मागासवर्ग आयोग काम करत नाही अशा शब्दात आयोगानं नाव न घेता जरांगेंना फटकारलंय.. मागासलेपण सिद्ध करण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ लागणारच असं मागासवर्ग आयोगानं सांगीतलंय…. 60-70 वर्षांमध्ये मराठा समाज मागास का झाला आणि खरोखर झाला आहे का, हे जोपर्यंत निश्चित होत नाही, तोपर्यंत आयोग तसा अहवाल देऊ शकत नाही असं आयोगानं म्हटलंय.
होम ग्राऊंडवर मनोज जरांगे भुजबळांना जोरदार उत्तर देणार की याचीच चर्चा सुरू आहे…1 डिसेंबर रोजी जालन्यामध्ये मनोज जरांगेंची जिल्हा पातळीवरील भव्य सभा होणारे…सकल मराठा समाज आणि जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 1 डिसेंबर रोजी जालन्यात सभा आयोजित केलीये….शनिवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये जरांगेंच्या सभेच्या तयारीबाबत चर्चा झाली…10 लाखांपेक्षा जास्त मराठा बांधव या सभेला हजेरी लावण्याची शक्यता आहे…शहरातील ऐतिहासिक आझाद मैदानावर ही सभा होणारे…सभेपूर्वी शहरातून भव्य रॅली काढण्याचं नियोजन करण्यात आलंय…आझाद मैदानावर होणाऱ्या यासभेचं वातावरण भगवमय करण्यासाठी प्रत्येकी एक झेंडा असं आवाहन करण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *