15/06/2024
Spread the love

अनेकांना नाश्त्यात पोहे खायला आवडतात. भारतात अनेक ठिकाणी पोहे हे आवडीने खाल्ले जातात. पोहे हा पटकन तयार होणारा पदार्थ आहे. पण तुम्हाला माहित आहे का की पोहे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पोह्यात जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर आणि लोह मुबलक प्रमाणात असतात. पोहे खालल्याने वजन कमी होते का असा प्रश्न अनेकांना आहे. जाणून घ्या खरं काय आहे.

  1. फायबरचा स्त्रोत ; पोह्यात फायबरचे प्रमाण पुरेसे असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते यामुळे तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
  2. लवकर भूक लागत नाही : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पोहे खाल्ल्यानंतर आपले पोट भरलेले राहते आणि आपल्याला लवकर भूक लागत नाही. त्यामुळे आपण जास्त खाणे टाळतो.
  3. पोहे खाल्ल्याने चरबी वाढत नाही ; तुम्ही नियमितपणे नाश्त्यात पोहे खाल्ल्यास तुमची पचनसंस्था सुदृढ राहते आणि जास्त खाण्याची सवय सुटते. त्यामुळे शरीरात अनावश्यक चरबी जमा होत नाही.
  4. अधिक प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढते : रक्तातील साखरेची पातळी आणि वजन वाढवण्यासाठी पोह्याचे नियमित सेवन जबाबदार मानले जाते. कारण पोह्यात कार्बोहायड्रेट मुबलक प्रमाणात असते.
  5. मर्यादित प्रमाणात करा सेवन ; तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही रोज मर्यादित प्रमाणात पोहे खाल्ले तर त्यामुळे तुमचे वजन वाढत नाही, मात्र जास्त प्रमाणात पोहे खाल्ल्याने लठ्ठपणा येऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *