17/06/2024
Spread the love

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुर्ला परिसरात रविवारी रात्री एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तपासासाठी गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि पोलीस पथकाने सुटकेस उघडली असता एका महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह राजावाडी रुग्णालयात दाखल करुन पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेलया माहितीनुसार, रविवारी (19 नोव्हेंबर) कुर्ला पोलीस ठाण्यात दुपारी 12 ते 12.30 च्या दरम्यान एक संशयीत बॅग आढळून आल्याचा फोन आला. सी.एस टी.रोड शांतीनगरच्या समोरील बाजूला मेट्रो रेल्वेच्या कामाच्या जागेवरील बॅरेकेटचे आतील बाजूस एक संशयित सुटकेस होती. पोलिसांनी त्या जागेवर जाऊन सुटकेसची तपासणी केली असता त्या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह मिळून आला. सुटकेसमध्ये मृतदेह असल्याने या प्रकरणात खुनाची बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. पोलिसांनी राजावाडी रूग्णालयात मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही
महिलेचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेने टीशर्ट आणि नाईट पॅन्ट घातली होता. महिलेचा मृतदेह ज्या सुटकेस बॅगेत आढळला ती सुटकेस दुमडलेली होती कुर्ला पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. या महिलेची ओळख पटवून देण्याचे प्राथमिक आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांनी मुंबई शहरात किंवा आजूबाजूच्या परिसरात कोणत्या महिलेची बेपत्ता असल्याची तक्रार आहे का हे ही तपासात आहेत. त्याचबरोबर त्या परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासात आहे. महिलेचा फोटोमार्फत ओळख पटवायचे काम सुरू आहेत.
नालासोपाऱ्यात नराधम बापानेच केला पोटच्या मुलीवर अत्याचार
वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात उघडकीस आली आहे. एका बापानेच स्वतःच्या 22 वर्षाच्या मुलीवर सातत्याने अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. पीडित मुलीचा क्षयरोगाने मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईने नराधम बापाविरोधात तक्रार नोंद केली आहे. पीडित मुलगी ही क्षयरोगाने आजारी असतानाही नराधमाने हे अत्याचार सुरू ठेवले होते. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *